Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिनापाठोपाठ ही अभिनेत्री देणार गोड बातमी

By admin | Updated: January 12, 2017 12:25 IST

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खानने नुकतीच एका गोड मुलाला जन्म दिल्याची बातमी ताजी असतानाचं बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री आई होणार असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खानने नुकतीच एका गोड मुलाला जन्म दिल्याची बातमी ताजी असतानाचं बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री आई होणार असल्याचे समोर आले आहे. बॉलिवूडची हॉट अभिनेत्री लिसा हेडन गर्भवती असल्याचे समोर आले आहे. लिसाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे जाणवते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लिसा बॉयफ्रेंड दिनो ललवानी सोबत लग्नाच्या बंधनात अडकली होती. 
 
लिसाने इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या फोटोला चाहत्यांनी चागंलाच प्रतिसाद दिला आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला आहे. इंस्टाग्राम शेअर केलेल्या फोटोत लिसा निळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये बेबी बंप दाखवताना दिसते आहे.