Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आता फक्त पैठणीची बिकिनी बाकी राहिली आहे", अदिती सारंगधरची फॅशन पाहून संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:13 IST

अदिती सारंगधरने घातला पैठणीचा फ्रॉक, फॅशन पाहून संतापले नेटकरी, म्हणाले- "आरशात बघत नाही का?"

झी मराठी चित्र गौरव पुरस्कारानंतर आता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. वर्षभरातील गाजलेल्या आणि उत्तम नाटके, आणि कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव केला जातो. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अदिती सारंगधरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. 'मास्टरमाइंड' या नाटकासाठी अदितीला हा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्याने चाहत्यांनी तिचं कौतुक तर केलंच पण, अभिनेत्रीला मात्र तिच्या आऊटफिटमुळे ट्रोल करण्यात आलं. 

अदितीने झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. या सोहळ्यासाठी तिने पैठणी थीम केली होती. पैठणीचा फ्रॉक घालत अदितीने या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. त्याबरोबरच पैठणीची बॅग, पैठणीचे शूज आणि डोक्यालाही पैठणीचा रबर असा लूक तिने केला होता. मात्र अदितीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. तिच्या या लूकवर कमेंट करत चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

"आता पैठणीची फक्त बिकिनी सूट बाकी आहे", "अशाप्रकारे पैठणीला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे", असं काहींनी म्हटलं आहे. 

तर काहींनी "पैठणीला काहीतरी आदर आहे", "किळस वाटली, फॅशन च्या नावा खाली काही करतात , शोभले तर पाहिजेठ, "आरशात बघत नाही का?", "टाकाऊतून टिकाऊ स्पर्धेच्या विजयी स्पर्धक", अशा कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, अदिती सारंगधरने अनेक मालिका, नाटक आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'वादळवाट', 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'हम बने तुम बने', 'लक्ष्य', 'माझे मन तुझे झाले' या मालिकांमध्ये ती दिसली. तर 'अकल्पित', 'धतिंग धिंगाणा', 'उलाढाल', 'मंडळी तुमच्यासाठी कायपण' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी