Join us  

Video : 'जिजाजींना नाही आणलं का?' प्रश्न विचारताच लाजली अदिती, हसतच म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 12:31 PM

साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अदिती मुंबई विमानतळावर दिसली.

अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari)  आणि अभिनेता सिद्धार्थ (Siddharth)  यांनी साखरपुडा केला आहे.  सिद्धार्थ आणि अदितीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या फोटोमध्ये दोघे अंगठी फ्लॉन्ट करताना दिसून आले. आता साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अदिती मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी एका पापाराझीने तिला सिद्धार्थबद्दल विचारताच अदिती लाजताना दिसली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

मुंबई विमानतळावर आदिती दिसताच पापराझींनी तिचं अभिनंदन केलं.   अदितीने एअरपोर्ट लूकसाठी डेनिम शर्टसह लेयर्ड को-ऑर्डर सेट घातला होता. ती खूप छान दिसत होती. पापाराजींनी यावेळी तिला 'जिजाजींना नाही आणलं का?' असा प्रश्नही तिला विचारला. यावर ती लाजली आणि हसतच तिनं सिद्धार्थ कामानिमित्त दुसरीकडे गेल्याचं सांगितलं.  या व्हिडीओमध्ये अदिती खूपच आनंदी दिसत आहे.

आदिती राव हैदरी आणि अभिनेता हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे फोटो शेअर करतात. सरुवातील आदिती आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली होती. दोघांनीतेलंगणा येथील वनपार्थीमधील श्रीरंगपुर रंगनाथ स्वामी मंदिरात लग्न केल्याचं म्हटलं जात होतं. यानंतर अफवांना पुर्णविराम देत अदितीने सिद्धार्थबरोबर एक फोटो शेअर केला आणि साखरपुडा केल्याचं जाहीर केलं.

अदितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तिची हीरामंडी ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. ही वेब सीरिज 1 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला,सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा,संजीदा शेख,शर्मीन सेगल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ लवकरच कमल हासनच्या इंडियन २ चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :आदिती राव हैदरी