Join us  

गृहिणींच्या लाडक्या भावोजींनी केदार शिंदेंना कडकडून मिठी मारली, 'बाईपण भारी देवा'चं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 9:23 AM

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले...

मराठीतील मध्यमवयीन वयातील दिग्गज अभिनेत्रींना एकत्र आणत दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Kedar Shinde) 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) सिनेमा आणला. चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर यांची धम्माल, मस्ती, भावूक क्षण सगळंच सिनेमात पाहायला मिळालं. प्रत्येक मध्यमवयीन बाईला तर सिनेमा खूपच जवळचा वाटतोय. तर गृहिणींचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर (Adesh Bandekar) देखील सिनेमा पाहून भावूक झालेत. त्यांनी केदार शिंदेंना थेट मिठीच मारली.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले,'गेली कित्येक वर्ष "होम मिनिस्टर" या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणारा..आदेश बांदेकर याने काल सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली.. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.'

शिवसेनेत फूट पडणार याची आदेश बांदेकरांना कल्पना होती?; सुचित्रा म्हणतात...

आदेश बांदेकरांच्या या प्रतिक्रियेनंतर केदार शिंदे यांनाही कळून चुकलं की आपला सिनेमा नुसता पोहोचला नाहीए तर तो सर्वांना मनापासून समजलाही आहे. बायकांच्या लाडक्या भावोजींकडूनच प्रतिक्रिया मिळाली म्हणल्यावर अजून काय हवं. शिवाय सिनेमात आदेश बांदेकरांची बायको सुचित्राही आहे. तिचंही काम सर्वांना खूपच आवडलंय. सध्या सिनेमागृहात महिलांची गर्दी जमली आहे हीच केदार शिंदे आणि सर्व कलाकारांसाठी यशाची पावती आहे.

बाईपण भारी देवा हा सिनेमा आज (३० जून) प्रेक्षकांच्या भेटीला आला . या सिनेमातून सहा बहिणींची गोष्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सहा बहिणींमधील प्रेम, त्यांच्यात आलेला दुरावा आणि त्यानंतर पुन्हा त्यांची झालेली भेट हा सगळा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमातून पाहता येणार आहे.

टॅग्स :आदेश बांदेकरकेदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपट