Join us  

अदा खान बनणार सुनिल ग्रोव्हरची पत्नी ह्या शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 1:37 PM

स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्‌या रूपात दिसून येणार आहे. ह्या खास कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सर्वांचा लाडका जीजू असेल आणि त्याच्यासोबत असेल त्याची धम्माल फॅमिली. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्‌या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल.

स्टार प्लसवरील 'बहनें'मधून अदा खान नावारूपास आली. ह्या शोमध्ये ती विनोदी रूपात दिसेल.  याबाबत अदा म्हणाली की, 'कॉमेडी माझा आवडता प्रकार आहे आणि मी त्यात नेहमीच संधी शोधते. मला ह्या शोची संकल्पना आवडली कारण ती वेगळी आणि खास आहे. यात मी सगळ्‌यात विनोदवीर सुनिल ग्रोव्हरसोबत दिसून येणार आहे. मी त्याच्या पत्नीची भूमिका करणार असून तिच्यासाठी तिचा पती आदर्श आहे. ती अतिशय चुणचुणीत आहे. मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आशा आहे की ह्या शोमुळे प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होईल.'स्टार प्लसवरील फॅमिली कॉमेडी शो 'कानपुरवाले खुराणाज्‌'मध्ये अदा खानसोबत सुनिल ग्रोव्हर, कुणाल खेमू, अलि असगर आणि सुगंधा मिश्रा प्रेक्षकांचे तुफान विनोदी मनोरंजन करताना दिसणार आहे. अदा खान व सुनिल ग्रोव्हर यांची केमिस्ट्री कशी वाटते, हे पाहणे मजेशीर ठरेल.

टॅग्स :कानपुरवाले खुराणाज्सुनील ग्रोव्हरअदा खान