Join us

मराठमोळी अभिनेत्री वैदही परशुरामीची नवी इनिंग, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:47 IST

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. वैदहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले.

तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. आता लवकरच वैदही आपल्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

आता ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा झी मराठी घेऊन येत आहे कॉमेडीचा एक नवीन तडका फु बाई फु हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत. तसेच काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत. या कार्यक्रमात हास्याची धमाल उडवून देणारे कलाकार कोण असणार आहेत याचीच चर्चा होताना सध्या दिसत आहे.

टॅग्स :वैदेही परशुरामीउमेश कामतझी मराठी