Join us  

तमन्नाचा १८ वर्ष जुना Video व्हायरल, म्हणाली, 'मी १० वीत आहे'; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 10:43 AM

तमन्ना भाटियाचा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये तिने दिलेले इंटिमेट सीन्स पाहून सगळेच अवाक झाले. तमन्नाचा साऊथ आणि बॉलिवूड दोन्हीकडे मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती विजय वर्माला डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. दरम्यान अभिनेत्रीचा १८ वर्ष जुना एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ती १० वीत असतानाचा हा व्हिडिओ आहे. 

तमन्ना भाटियाचा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती कोणत्या वर्गात आहे आणि तिचा डेब्यू कसा झाला हे सांगताना दिसतेय. १८ वर्ष जुन्या व्हिडिओत तमन्नाचा लुक पाहून चाहते शॉक झालेत. तमन्ना १० वीत सुद्धा तितकीच सुंदर दिसत होती असं चाहते म्हणत आहेत. तर काहींनी ती अजिबातच टीएनएज लुकमध्ये दिसत नाही असं म्हटलं आहे. ती व्हिडिओत म्हणते,'जेव्हा मी सिनेमा साईन केला तेव्हा मी १३ वर्षांची होते. मी सध्या शाळेत आहे. २००५ साली मी १० वी पूर्ण करेन. सध्या मी अभ्यास करत आहे.'

तमन्नाचा १० वी तील हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंटबाजी सुरु केली आहे. एकाने लिहिले,'ही गंमत करत आहे. ही १० वीत असल्यासारखं वाटतच नाहीए.' तर आणखी एकाने लिहिले,'१५ व्या वर्षी इतका मॅच्योर आवाज.वाह.' तर काही युझर्सने पूर्ण गणितच मांडलं. एकाने लिहिलं,'तमन्नाचा जन्म 1989 साली झाला. मग ती डेब्यूच्या वेळी १० वीत असताना १६ वर्षांची झाली.' काही जणांनी तिच्या वयावरच संशय घेत ही तर २५ वर्षांची दिसत आहे असे म्हटले.

तमन्ना भाटियाने २००५ साली अभिजित सावंतच्या 'लफ्जो' या म्युझिक अल्बममधून करिअरला सुरुवात केली. तिने तेलुगू, तमिळ आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. २००५ साली 'चांद सा रोशन चेहरा' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

टॅग्स :तमन्ना भाटियासोशल मीडियाबॉलिवूडट्रोल