Join us

सनी लिओनीचं टिकाकारांना सडेतोड उत्तर, काय म्हणाली सनी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:24 IST

'करनजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान ती म्हणाली की, तिचं नाव अनेक वादांमध्ये ओढलं जातं, ती एक सोपा निशाणा होऊ शकते पण पीडित नाही. 

मुंबई : सनी लिओनी ही नेहमीच वेगवेगळ्या वादात अडकली जाते. सनीवर वेळोवेळी टिका केली जाते. आता सनी लिओनीने आपल्या टिकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 'करनजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान ती म्हणाली की, तिचं नाव अनेक वादांमध्ये ओढलं जातं. ती एक सोपा निशाणा होऊ शकते पण 'पीडित' नाही. 

काही दिवसांपूर्वी सनीचे काही डान्स इव्हेंटस् रद्द करण्यात आले होते आणि तिच्यावर काही राजकीय नेत्यांनी टिकाही केली होती. स्वत:ला पीडित समजण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, 'मी स्वत:कडे कधीही पीडित असल्यासारखे बघत नाही. कदाचित मी सोपा निशाणा असू शकते. मला वाटतं की, लोकांना बोलण्याचं स्वातंत्र असलं पाहिजे. ते चुकीचं असो वा बरोबर ती त्यांची पसंत आणि नैतिकता आहे'.

सनी पुढे म्हणाली की, 'मी या गोष्टींकडे कधीही लक्ष देत नाही. कारण त्या सर्व चुकीच्या गोष्टी आहेत. कधी कधी या गोष्टींचा त्रास होतो. पण मी याकडे दुर्लक्ष करते'.

'करनजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या वेब सीरिजमधून सनी लिओनीच्या पॉर्न ते बॉलिवूड प्रवास दाखवला जाणार आहे. त्यामुळे त्यातून तिच्याबाबत तिच्या चाहत्यांना बरंच काही जाणून घेता येणार आहे.

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूड