Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याच्या मुहूर्तावर अप्सरेने दुबईत खरेदी केलं नवं घर, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 14:16 IST

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनालीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) तिचा अभिनय आणि नृत्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत तिचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. तिचा दमदार अभिनय, अप्सरेसारखं सौंदर्य, तिचा फिटनेस आणि बहारदार नृत्य सगळंच खास. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. सोनाली दिवाळी पतीसोबत दुबईत साजरी करते आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनालीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

कुटुंबियांच्या अनुपस्थितीत दुबईला ७ मे २०२१ रोजी सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला घरातल्या मंडळींनी ऑनलाइन हजेरी लावून आशीर्वाद दिला होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला होता. हळद, मेहेंदी सोहळा, संगीत सोहळा या सर्वांचा तिला अनुभव घ्यायचा होता लग्नातली राहून गेलेली हौस तिला पूर्ण करायची होती आणि म्हणूनच तिने कुणाल सोबत लग्न केले. यावेळी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना तिने निमंत्रित केले होते. सोनाली दुबई आणि मुंबई असा प्रवास कामानिमित्त करत असते.

दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईत नवं घर खरेदी केल्याची माहिती अप्सरेने चाहत्यांना दिली आहे. नव्या घरात केलेलं पारंपारिक लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहेत. हे फोटो शेअर करताना सोनालीने लिहिले, ''पाडवा in the new होम.''  

वर्कफ्रंटबद्दल'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने साकारलेली बकुळा प्रेक्षकांना खूपच भावली होती. या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. सोनालीनं आतापर्यंत अनेक सिनेमांत काम केलं आहे. त्यात गाढवाचं लग्न, गोष्ट लग्नाची, नटरंग, अजिंठा, झपाटलेला २, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, ,पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, हिरकणी, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. अभिनयाबरोबच सोनाली उद्योजिका देखील झाली आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी