Join us
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यानंतर आता 'या' मराठी प्रसिद्ध जोडीने गुपचूप उरकले लग्न, पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 13:33 IST

'बन मस्का' या मालिकेच्या सेटवर दोघांची खूप चांगली मैत्री झाली.

 गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. अभिनेत्री ऋचा आपटे आणि अभिनेता क्षितीश दाते यांनी साखरपुड्या नंतर आता गुपचूप  लग्नही उरकून घेतलं आहे.  ऋचा आणि क्षितीक्षने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. इंडस्ट्रीतील त्यांच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

क्षितीश आणि ऋचा त्यांच्या लग्नातील एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. पण इन्स्टास्टोरीवर त्यांनी मित्रांनी पोस्ट केलेले फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. हिरव्या रंगाच्या साडीत ऋचा खूपच सुंदर दिसते आहे. ऋचाने गेल्याच वर्षी अभिनेत्री क्षितीश दातेसोबत साखरपुडा केला होता. मात्र इतरांप्रमाणे ऋचाने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली नव्हती. साखरपुड्याच्या एक वर्षानंतर तिने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 

क्षितीजने 'मुळशी पॅटर्न' सिनेमात काम केले आहे. ऋचाने 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत झळकली होती, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतही ती राणा दाच्या ट्रेनरच्या भूमिकेत झळकली होती. सध्या 'अस्सं माहेर नको गं बाई' मालिकेत ऋचा झळकत आहे. याशिवाय अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. विशेष म्हणजे ऋचा आणि क्षितिज 'बन मस्का' या मालिकेतून एकत्रित काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगला