केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी हजारो उमेदवार परीक्षेला बसतात, परंतु त्यापैकी काहीच परीक्षा उत्तीर्ण होतात आणि प्रशासकीय अधिकारी बनतात. हे उमेदवार परीक्षेच्या तयारीसाठी बरीच मेहनत करतात. पण, एक उमेदवार अशी आहे की, जिने तिच्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली पण नंतर आयएएस अधिकारी होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण झाली.
एच एस कीर्थना असं या अभिनेत्रीचं नाव असून तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. आता ती आयएएस अधिकारी झाली आहे. चित्रपटांमध्ये यशस्वी कारकीर्द असूनही, अभिनेत्रीने आपला दृढनिश्चय दर्शविला आणि देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्थना 2013 मध्ये प्रथमच UPSC CSE साठी हजर झाली आणि 2020 मध्ये तिने क्रॅक केली आणि 167 च्या रँकसह (AIR) IAS अधिकारी झाली. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून तिच्या पहिल्या पोस्टिंगवर रुजू झाली होती.
UPSC ही अत्यंत कठीण परीक्षा असल्याने अनेक उमेदवारांनी ती अर्धवट सोडली, परंतु अभिनेत्री एच एस कीर्थनाने प्रशासकीय सेवेत करिअर केले. कीर्थना ही एक लोकप्रिय बालकलाकार होती जी कर्पुरडा गोंबे, गंगा-यमुना, मुदिना आलिया, उपेंद्र, ए, कानूर हेग्गदती, सर्कल इन्स्पेक्टर, ओ मल्लिगे, लेडी कमिशनर, हब्बा, डोरे, सिंहाद्री, जननी, चिगुरु अशा विविध मालिकांमध्ये दिसली. तसेच अनेक चित्रपटात काम केलं आहे.
कीर्थनाला अनेक ऑफर्स मिळाल्या, पण नंतर तिने स्वत:ला या चकचकीत जगापासून दूर केले आणि देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ही अभिनेत्री मोठी झाली तेव्हा तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं. बालकलाकार ते आयएएस अधिकारी हा तिचा प्रवास सोपा नव्हता. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तिने खूप परिश्रम केले आणि अनेक समस्यांचा सामना केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.