Join us  

अभिनेत्री मयुरी देशमुखने दिवंगत नवऱ्यासाठी लिहिली इमोशनल कविता, चाहतेही झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 5:43 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या दिवंगत नवऱ्यासाठी इमोशनल कविता लिहिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होताना दिसत आहे. तिने तिचा दिवंगत नवरा आशुतोष भाकरेच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मयुरीने त्याच्यासाठी इमोशनल कविता लिहिली आहे. 

मयुरी देशमुखने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक कविता शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले की, मी जवळचे आणि प्रिय लोकांना कविता लिहिले, मग अजून तुझ्यासाठी का नाही, याचे तुला आश्चर्य वाटत असेल.??? हे तुझे ६१वा वाढदिवसाचे गिफ्ट असेल जे मी तुला सांगते. इतके अज्ञातपणे आशावादी आयुष्याच्या वेगळ्या छटा रंगवत होतो. असं असलं तरी इथे खूप वेळ होता.

यापुढेही मयुरीने बरेच काही लिहिले आहे, जे पोस्टमध्ये पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर मयुरीने आपल्या नवऱ्यासोबतचे विविध क्षणांचे फोटोंचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. मयुरीची इमोशनल कविता पाहून चाहतेदेखील भावुक झाले आहेत. चाहते सातत्याने कमेंट करत तिला काळजी घ्यायला सांगत आहेत.

मयुरी देशमुखच्या नवऱ्याने मागील वर्षी आत्महत्या केली होती. तो कित्येक वर्षांपासून डिप्रेशनचा सामना करत होता आणि त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले होते. नवऱ्याच्या निधनानंतर मयुरी देशमुखने सांगितले की तिला लोक दुसरे लग्न करण्याचा सल्ला देत राहिले पण तिने दुसरे लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. मयुरी देशमुखचे म्हणणे आहे की एक बाळ दत्तक घेणार आहे आणि त्याच्यासोबत संपूर्ण जीवन व्यतित करणार आहे.

टॅग्स :मयुरी देशमुख