Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्या या वाईट सवयीला कंटाळलीय अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, म्हणते - "कोणत्याही परिस्थितीत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:30 IST

Killer Soup : अभिनेता मनोज वाजपेयीची वेबसीरिज किलर सूपमध्ये कोंकणा सेन शर्मा झळकणार आहे.

अभिनेता मनोज वाजपेयीची वेबसीरिज किलर सूपमध्ये कोंकणा सेन शर्मा झळकणार आहे. कोंकणा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती किलर सूपच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान तिने तिच्या एका वाईट सवयीबद्दल खुलासा केला आहे आणि ती सवय सोडायची असल्याचे म्हटले आहे.

सध्या कोंकणा सेन शर्मा आणि मनोज वाजपेयी त्यांची आगामी वेबसीरिज 'किलर सूप'साठी सातत्याने चर्चेत आहेत. मालिकेच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री अनेकदा एक ना काही नवीन खुलासा करत असते. नुकतीच कोंकणा सेन शर्माने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. यादरम्यान कोंकणाला तिच्या एका वाईट सवयीबद्दल प्रश्न विचारण्यात आले, ज्यावर अभिनेत्री म्हणाली की, "जर आपण माझ्या एका वाईट सवयीबद्दल बोललो तर ती सिगारेट आहे." जरी मी जास्त प्रमाणात धूम्रपान करत नसली, तरीही मला माझी ही वाईट सवय आता नको आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत सोडायची आहे.

''हा काळ आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता''

याशिवाय कोंकणा सेन शर्माला तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा काढून टाकण्याबद्दल विचारण्यात आले होते, ज्यावर 'किलर सूप' अभिनेत्रीने सांगितले की ती ३ महिने अंथरुणाला खिळलेली होती, तिला आयुष्यातून तो काळ काढून टाकायचा आहे. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.

'किलर सूप' या दिवशी होणार रिलीज मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांच्या आगामी 'किलर सूप' या वेबसिरीजचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरिजच्या रिलीज डेटवर नजर टाकल्यास, किलर सूप ११ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :कोंकणा सेन शर्मामनोज वाजपेयी