Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानला वेदना असह्य, पोस्ट करुन म्हणाली- "प्लीज अल्लाह मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 09:34 IST

अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. हिना खानने सोशल मीडियावर एक नवी पोस्ट केली आहे. ज्यामुळे चाहत्यांना तिची काळजी वाटली आहे (hina khan)

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. हिना खान सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. हिनाने काहीच दिवसांपूर्वी तिला झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितलं. हिना सोशल मीडियावर तिला झालेल्या कॅन्सरबद्दल चाहत्यांना अपडेट करत असते. अशातच हिनाच्या नव्या पोस्टने तिच्या चाहत्यांच्या मनात कालवाकालव झाली आहे. हिनाची नवी पोस्ट पाहून तिला वेदना असह्य झालेल्या दिसत आहेत.

हिनाच्या नव्या पोस्टने वाढली चाहत्यांची चिंता

कॅन्सरशी झुंज देत असलेली अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. नुकताच हिनाने तिचे केस कापतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. आता बुधवारी रात्री तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नवीन पोस्ट शेअर केली. ती पोस्ट पाहून हिनाला असह्य वेदनांना सामोरं जावं लागत असल्याचं दिसतंय. हिना खानने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करुन हिना लिहिते- "अल्लाहशिवाय कोणीही तुमचे दुःख दूर करू शकत नाही. प्लीज अल्लाह, प्लीज."

हिनाने ट्रीटमेंट घेण्याआधी कापलेले केस

अभिनेत्री हिना खानने काही दिवसांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची धक्कादायक बातमी दिली. हिनाला 3rd स्टेज ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. या कठीण परिस्थितीतही ती सकारात्मकतेने आयुष्य जगण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तिची जिद्द, हिंमत पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. हिनाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. कॅन्सरमध्ये केस गळण्याआधीच तिने आपले लांबसडक केस कापले आहेत. हा भावुक व्हिडिओ पाहून तिचे चाहते तिला धीर देताना दिसले.

 

टॅग्स :हिना खानकर्करोगस्तनाचा कर्करोग