Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुबेहुब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली खरेची लेक; अभिनेत्रीनं वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 12:41 IST

या व्हिडीओमध्ये माय-लेकींमधील स्पेशल बॉन्ड दिसतोय. सनाया दिसायला हुबेहुब आईसारखी आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनाली अनेकवेळा तिच्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील सोशल मीडिबयावर शेअर करत असते. 

सोनालीच्या लेकीचं आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सोनालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये माय-लेकींमधील स्पेशल बॉन्ड दिसतोय. सोनाली खरेच्या मुलीचं नाव सनाया आहे. सोनालीने सनायाच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या सर्व फोटोंना एकत्र केल्याचे दिसते. सनाया दिसायला हुबेहुब आईसारखी आहे. 

सोनालीने हा व्हिडीओ पोस्ट करताना एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सोनाली लिहिते, ''आपण कायम एकत्र असू, मी तुझ्यासाठी असेन आणि तू माझ्यासाठी असशील.''  सोनालीच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी सनायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.  

सनायाने एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. ‘ब्लड रिलेशन’ असं तिच्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. विशेष म्हणजे कमी वयात सनायाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सनाया सोनाली आणि बिजय आनंद यांची एकुलती एक लाडकी लेक आहे. बिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ आसमाँ या मालिकेद्वारे केली होती. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

टॅग्स :सोनाली खरे