सीएनएक्स एक्सक्लुझिव्ह / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बॉलिवूड प्रमाणे आता मराठी चित्रपटसृष्टीतही बोल्डनेस येऊ लागला आहे. मराठी अभिनेत्रीही आपला बोल्ड फोटो प्रसिद्ध करु लागल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशीचा असाच एक हॉट लूकमधला फोटो चर्चेचा विषय बनला आहे. तिने सोशल मीडियावर हा फोटो अपलोड केला आहे.
स्पृहाची प्रेक्षकांमध्ये एक इमेज आहे. त्या इमेजपेक्षा तिने अपलोड केलेला हा फोटो पूर्णपणे वेगळा असल्याने प्रेक्षकांसाठी एक धक्का आहे. स्पृहाच्या या फोटोला सोशल मीडियाने देखील पसंतीची पावती दिली आहे. आगामी चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी स्पृहाने हॉट लूकमधला फोटो अपलोड केला आहे ? कि, असाच फोटो टाकला ते अजून गुलदस्त्यात आहे.
स्पृहाने मायबाप, मोरया, बायस्कोप, पैसा पैसा, लॉस्ट अॅण्ड फाउंड चित्रपट केले आहेत तसेच तिने अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तिचे अभिनेता उमेश कामतसोबत डोण्ट वरी बी हॅपी हे नाटक लोकप्रिय आहे.