Join us  

"देशातील राजकारण्यांवर अवलंबून राहू नका"; सोनू सूद असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 3:23 PM

सोनू सूदने सध्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. यात सोनू सूदने राजकारण्यांवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिलाय. वाचा सविस्तर (sonu sood)

सोनू सूद हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो. सोनू गरीब लोकांना मदत करण्यात पुढे असतो. लॉकडाऊनच्या काळात सोनूने केलेली मदत सर्वांना माहितच आहे. सोनूला 'गरीबांचा मसीहा' असंही म्हणतात. सोनू सहसा राजकीय वातावरणावर मतं व्यक्त करणं टाळतो. परंतु नुकतंच सोनूने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. काय म्हणाला सोनू? जाणून घ्या.

शुक्रवारी सूनने X वर #AskSonu हे सेशन चालवले. हे सेशन सुरु करताच त्याच्या चाहत्यांनी लगेच प्रश्नांचा वर्षाव सुरू केला. यादरम्यान मनू नावाच्या एक्स वापरकर्त्याने सोनू सूदला विचारले, “सर, तुम्हाला काय वाटते, कोणत्या गोष्टी भारताला बदलू शकतात.” युजरच्या या प्रश्नाला सोनू सूदने उत्तर दिले की, “राजकारणींवर विश्वास ठेवू नका. सामान्य लोकांनीही जीवन बदलण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.” सोनूने दिलेलं हे उत्तर चर्चेत आहे.

सोनू सूद आगामी 'फतेह' सिनेमातून भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी सांगायचे तर.. सोनू या चित्रपटात ॲक्शन अवतारात दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझरचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात सून सूदशिवाय जॅकलीन फर्नांडिसही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे सोनूनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमा लवकरच भेटीला येईल.

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूड