Join us

"पुढच्या वेळी चोर आला तर...", चाकू हल्ल्यानंतर धाकटा लेक जेहची काय होती प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:56 IST

चाकूहल्ल्यानंतर सैफने पहिल्यांदा मुलाखत दिली आहे.

Saif Ali Khan Reacts On Knife Attack:बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) याच्यावर मध्यरात्री २.३० (१६ जानेवरी) एका चोराने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. सैफच्या मुंबईतील राहत्या घरी ही घटना घडली होती. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपीने झटापटीत सैफवर ६ वेळा चाकूने वार केला होता, यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. त्याच्या पाठीतून २ इंचाचा चाकूचा तुकडाही काढण्यात आला. या जीवघेण्या हल्यातून सैफसह त्यांचं संपुर्ण कुटुंब अर्थात मोठा मुलगा तैमूर, धाकटा लेक जेह आणि पत्नी करीना कपूर सावरत आहेत. अशातच आता चाकूहल्ल्यानंतर सैफने पहिल्यांदा मुलाखत दिली आहे.

'दिल्ली टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सैफ व्यक्त झाला. हल्यानंतर दोन्ही मुले आणि पत्नी करीना कपूरची काय अवस्था झाली, याबद्दल अभिनेत्याने सांगितलं. धाकटा चार वर्षांचा मुलगा जेहनं सैफला संरक्षणासाठी आपली प्लास्टिकची तलवार दिली आणि  "नेहमी बेडच्या बाजूला ठेवा. पुढच्या वेळी चोर आला तर याचा वापर करा", असं तो म्हणाल्याचं सैफनं सांगितलं.

चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या ८ वर्षांचा मुलगा तैमूर थोडा तणावात असल्याचं सैफनं सांगितलं. तर मोठी मुले सारा आणि इब्राहिम खूप भावनिक झाली होती. त्या घटनेनंतर, मुलांनी त्याच्यासोबत बराच वेळ घालवल्याचं सैफ म्हणाला. कठीण प्रसंगात कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिल्याचं सैफनं सांगितलं. यावेळी पत्नी करीना कपूरचं हिचं मजूबत म्हणून वर्णन केलं.

दरम्यान, सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ठाणे येथून आरोपीला अटक करण्यात आली होती. सध्या याप्रकरणी पोसिलांची कसून चौकशी सुरु आहे. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. अभिनेत्री करीना कपूर हिचा देखील जबाब नोंदवण्यात आला.

टॅग्स :सैफ अली खान तैमुरकरिना कपूर