Join us

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी प्रियकर राहुल राज सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर

By admin | Updated: April 12, 2016 19:28 IST

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकर राहुल राज सिंगला कोर्टाकडून ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकर राहुल राज सिंगला कोर्टाकडून ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राहुल राजला १८ एप्रिलपर्यंत रोज सकाळी ११ ते दुपारी १च्या दरम्यान पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
 
अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्या नंतर राहूलने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जीनी राहुलविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करून प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
दरम्यान, प्रत्युषाने आर्थिक तणावातून आत्महत्या केली असावी असे राहुलने कोर्टात दिलेल्या जमीन अर्जामध्ये म्हटले आहे. तिच्यावर चार बँकांचे कर्ज होते. ज्याचे हफ्ते तिला भरता येत नव्हते. मला तिच्याशी लग्न करायचे होते, मी तिला एक हिऱ्याची अंगठी देखील दिली होती, असेही त्याने नमूद केले आहे.