Join us

अभिनेता अली फजलवर कोसळला दु:खाचा डोंगर लखनऊमध्ये झाले आईचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:16 IST

अलीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अली फजलच्या आईचे बधुवारी निधन झाले आहे. अलीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अलीशिवाय त्याची गर्लफ्रेंड ऋचा चड्ढासुद्धा अलीच्या आईला श्रद्धांंजली वाहिली आहे. 

अली फजलची आई उज्मा सईद यांचं बुधवारी सकाळी लखनऊमध्ये निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लखनऊमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. आईचे निधन झाल्यानंतर अली खूपच भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अली लिहितो, ''अम्मा तुझी  कायम आठवण येईल. आपला एकत्र प्रवास इथं पर्यंतचा होता, तू माझी प्रेरणास्रोत होती,  माझे सर्वस्व होतीस. तुझा लाडका अली.'' 'फुकरे' व 'फुकरे २' सिनेमातून अलीने प्रेक्षकांना भुरळ पडली. लवकरच अली हॉलिवूड सिनेमा 'डेथ ऑन द नाइल' आणि वेबसिरीज 'मिर्झापूर' सीझन 2मध्ये दिसणार आहे. पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर अली लवकरच गर्लफ्रेंड  ऋचा चड्ढासोबत लग्न करु शकतो.  

अली फजल आणि रिचा चड्ढा एप्रिल महिन्यात लग्नबेडीत अडकणार होते. ते एप्रिल महिन्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार होते. पण आता कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे.

टॅग्स :अली फजल