Join us  

Imran Khan Video: इमरान खानच्या आयुष्यात 'लेडी लव्ह'ची एन्ट्री? साऊथ अभिनेत्रीच्या हातात हात घालून झाला स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 11:27 AM

Imran Khan : इमरान पत्नी अवंतिकापासून कधीच विभक्त झाला आहे. पण आता कदाचित इमरान पुन्हा प्रेमात आहे. होय, सध्या त्याच्या लव्हलाईफची चर्चा आहे.

आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खान (Imran Khan ) याने ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला पण आज इमरान बॉलिवूडच्या झगमगटापासून दूर आहे. त्याला ओळखंण हा कठीण झालं आहे. इमरान पत्नी अवंतिकापासून कधीच विभक्त झाला आहे. पण आता कदाचित इमरान पुन्हा प्रेमात आहे. होय, सध्या इमरानच्या लव्ह लाईफची चर्चा आहे. इमरानचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. इमरान या मिस्ट्री गर्लला डेट करत असल्याची चर्चाही सुरू झालीये. आता ही मिस्ट्री गर्ल कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर तिचं नाव लेखा वॉशिंग्टन (Lekha Washington).

व्हायरल व्हिडिओत इमरान व लेखा दोघंही हातात हात घालून दिसत आहेत. इमरान ब्लॅक टी शर्ट व ब्ल्यू जीन्समध्ये आहे तर लेखा प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसतेय. दोघांनी एकमेकांचा हात पकडला आहे. दोघंही आनंदी दिसत आहेत. इमरान व लेखाचं नेमकं काय नातं आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं मानलं जात आहे.

गेल्या वर्षी इमरान पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त झाल्यामुळे चर्चेत आला होता. अवंतिका इमरानचं घर सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा दोन्ही कुटुंबानी बराच प्रयत्न केला. पण इमरान व अवंतिकाच्या नात्यातले मतभेद कायम राहिले.   इमरानने 2011 साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. 

लेखामुळेच मोडला इमरान व अवंतिकाचा संसार?लेखामुळेच इमरान व अवंतिकाचा संसार मोडल्याची चर्चाही बी टाऊनमध्ये आहे. लेखाचा पूर्वाश्रमीचा नवरा पाबलो चॅटर्जी व इमरान खूप चांगले मित्र आहेत. लेखा ही साऊथची अभिनेत्री आहे. तामिळ व तेलगू चित्रपटांत ती सक्रीय आहे. दोघांनी मटरू की बिजली का मंडोला या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अभिनेत्री असण्यासोबत डिझाईनर व लिरिसिस्टही आहे. लेखाने २०१७ साली पाबलो चॅटर्जीसोबत लग्न केलं होतं. मात्र आता दोघं विभक्त झाल्याच्या बातम्या आहेत.

इमरानने 'आय हेट लव्ह स्टोरी', 'आफ्टर ब्रेक', 'देल्ली-बेली, 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'वन्स अपॉन टाइम मुंबई अगेन' अशा अनेक चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' या सिनेमात तो कंगना रनौत सोबत तो शेवटचा दिसला होता.  त्याने आता अभिनय सोडला असून आता तो चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करत असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :इमरान खानआमिर खानबॉलिवूड