Join us

'आई कुठे काय..'फेम पुनम चांदोरकच्या लेकीला पाहिलंय का? स्वप्नील जोशीसह शेअर केलीय स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 15:18 IST

Punam Chandorkar: 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धच्या बहिणीची विशाखाची भूमिका अभिनेत्री पूनम चांदोरकर (Punam chandorkar) साकारत आहे.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेविषयी वा त्यातील कलाकारांविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे ही कलाकार मंडळीदेखील त्यांच्या जीवनातील लहानमोठे अनुभव, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील विशाखाच्या लेकीचा फोटो व्हायरल होत आहे. विशाखाच्या लेकीनेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धच्या बहिणीची विशाखाची भूमिका अभिनेत्री पूनम चांदोरकर (Punam Chandorkar) साकारत आहे. पुनम सोशल मीडियावर सक्रीय असून अलिकडेच तिने लेकीविषयी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये आपल्या लेकीने पहिल्यांदाच कॅमेरासमोर अभिनय केला असं सांगितलं.

"आर्या....माझी छोटीशी आर्या कधी एवढी मोठी झाली... त्यादिवशी शूटिंगच्या निमित्ताने पहिल्यांदा तू कॅमेरा फेस केलास आणि "स्वप्निल जोशी आणि पल्लवी पाटील "या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केलीस. खूप खूप आनंद वाटत आहे. मला सगळे सांगायचे की तुझी मुलगी आहे तिला का कुठे पाठवत नाहीस का घेऊन जात नाही, पण योग्य वेळ आणि योग्य संधी याची वाट बघावी लागते... आणि या ऍड मधून तुला ती मिळाली खूप खूप आशीर्वाद तुला..., अशी पोस्ट पूनमने लिहिली आहे. सोबतच आपल्या लेकीचा फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, पूनमच्या लेकीने जाहिरातीच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. तिच्या लेकीचं नाव आर्या असं असून तीदेखील पूनमप्रमाणेच शांत स्वभावाची असल्याचं दिसून येतं. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनसेलिब्रिटीस्वप्निल जोशी