Join us

"४ वर्ष, १२०० एपिसोड आणि...", 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 18:25 IST

'आई कुठे काय करते' मालिकेने १२०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या निमित्ताने मधुराणीने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 

मधुराणीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच 'आई कुठे काय करते' मालिकेने १२०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या निमित्ताने मधुराणीने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. "आई कुठे काय करतेला ४ वर्ष पूर्ण झाली. आज आम्ही १२०० वा एपिसोड पूर्ण केला. किती छान प्रवास होता!!!", असं मधुराणीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका २०१९ पासून प्रसारित होत आहे. २३ डिसेंबर २०१९ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. ही मालिका आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकरटिव्ही कलाकार