Join us

'फोटोशूट करताना बाईकवरील मुलाने मला...'; उर्फीने सांगितला संतापजनक प्रकार, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:46 IST

अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेदसोबत एका १५ वर्षांच्या मुलाने गैरप्रकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आलीय (urfi javed)

अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे उर्फी जावेद.उर्फी जावेदचे चित्रविचित्र कपडे आणि तिच्या नखरेल अदा सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत असतात. उर्फी जावेद अनेकदा पापाराझींसोबत मजा-मस्ती करताना दिसते. पण उर्फीला नुकतंच पापाराझींसोबत फोटोशूट करताना एक वाईट अनुभव आला आहे. एका १५ वर्षांच्या मुलाने उर्फीला सर्वांसमोर विचित्र प्रश्न विचारला असल्याने तिचा संताप अनावर झालाय. 

उर्फीसोबत घडला विचित्र प्रकार

उर्फी जावेदसोबत काल विचित्र प्रकार घडला आहे. उर्फीने आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. उर्फी लिहिते, "काल मी आणि माझ्या कुटुंबासोबत अत्यंत वाईट गोष्ट घडली. पापाराझी माझं फोटोशूट करत होते. त्याचवेळी बाईकवर असणारा एक मुलगा तिथून जात होता. त्या मुलाने मला विचारलं तुझं बॉडी काऊंट काय आहे?. अवघ्या १५ वर्षांचा तो मुलगा होता. माझ्यासोबत त्यावेळी माझं कुटुंब आणि आईही सोबत होती. 

मला त्या मुलाला मारायचं मन: उर्फी

पुढे उर्फीने आणखी एक कॅप्शन लिहिलंय की, "तुम्ही माझा चेहरा बघू शकता. मी किती हैराण झाले होते. मला त्या मुलाला जोरात मारुन त्याला धडा शिकवायचं मन होतं. कृपया तुमच्या मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवा. या मुलाच्या पालकांसाठी मला वाईट वाटतंय." अशाप्रकारे उर्फीने तिचा राग व्यक्त  केलाय. उर्फीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिची प्रमुख भूमिका असलेली 'फॉलो कर लो यार' ही नवी वेबसीरिज चर्चेत आहे.

टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूड