Join us  

2019 आधी रुपेरी पडद्यावर झळकणार PM मोदींचा बायोपिक, कोण साकारणार भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 12:31 PM

नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत ज्यांच्यावर ते पंतप्रधान पदावर असताना सिनेमा करण्याची योजना आखली जात आहे. चला जाणून घेऊया त्यांच्यावर तयार होत असलेल्या सिनेमाबाबत...

मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आता 4 वर्ष पूर्ण होणार आहेत. येत्या 26 मे रोजी भाजपाच्या सरकारला 4 वर्ष पूर्ण होतील. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तेच दुसरीकडे नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत ज्यांच्यावर ते पंतप्रधान पदावर असताना सिनेमा करण्याची योजना आखली जात आहे. चला जाणून घेऊया त्यांच्यावर तयार होत असलेल्या सिनेमाबाबत...

कधी होऊ शकतो रिलीज?

पंतप्रधान मोदी यांच्यावर तयार होत असलेल्या सिनेमावर निर्माता-दिग्दर्शक अनेक प्रकारच्या योजना तयार करत आहेत. त्यांचा मानस आहे की, मोदी सरकारचे 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच हा सिनेमा रिलीज करावा. जेणेकरुन देशातील जनतेला 2019 निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानांचा पूर्ण लेखाजोखा माहीत व्हावा. 

कोण साकारणार मोदींची भूमिका?

पंतप्रधान मोदी यांच्यावर आधारीत सिनेमात त्यांची भूमिका कोण साकारणार याबाबत अनेक अभिनेत्यांची नावे समोर येत आहेत. अनेकांची नावे समोर आली असली तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती अभिनेते परेश रावल यांच्या नावाची. त्यासोबतच अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांच्याही नावाची चर्चा होत आहे. पण अजून कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत सिनेमात त्यांच्या भूमिकेसाठी अभिनेता अक्षय कुमार, परेश रावल, अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

कोण लिहित आहे सिनेमा?

सामाजिक समरसता नावाचं एक पुस्तक मिहिट बूटा आणि किशोर मकवाना यांनी लिहिलं होतं. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेखांवर आणि भाषणांवर आधारीत होतं. या सिनेमाची कथाही हे दोघेच लिहित आहेत. या कथेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकत होते त्या काळापासून होणार असल्याची चर्चा आहे. 

सिनेमाचं टायटल आणि दिग्दर्शन

दिग्दर्शक रुपेश पाल पंतप्रधान मोदींवर तयार होत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन करु शकतात. दिग्दर्शक रुपेश यांनी काही दिवसांपूर्वी सांगितते होते की, या सिनेमाचं टायटल 'नमो' असं ठेवलं जाईल. पण याबाबत अजूनही काही निश्चित झालेलं नाहीये.  

टॅग्स :नरेंद्र मोदीबॉलिवूड