प्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खान यांनी नमाजवरून महत्वाचे वक्तव्य केले आहे. फराह या मुस्लिम आहेत तर तिचा पती शिरीष कुंदर हा पंजाबी आहे. यावरून फराहला तिच्या एका चाहतीने नमाज अदा करते का असा सवाल केला होता. यावर तिने उत्तर दिले आहे.
फराहला तिच्या चाहतीने विचारलेले की ती दिवसातून पाचवेळा नमाज अदा करते का, रोजा ठेवते का, अल्लाहवर विश्वास ठेवते का. आता या अशा धार्मिक प्रश्नांवर हिरो, हिरोईन उत्तर देणे टाळतात किंवा हो असे म्हणतात. परंतू फराहने सरळ नाही असे उत्तर दिले आहे. रेडिटवर तिला हा प्रश्न विचारण्यात आला होता.
जसे की लकी अली करतात तसे तुम्ही करत असाल असे मला वाटत नाही, असेही या फॅनने म्हटले होते. तसेच यात शाहरुख खान, सलमान खान हे देखील धर्माप्रति किती निष्ठा ठेवतात हे मला जाणून घ्यायचे आहे. मी अमेरिकेत राहते, यामुळे मला असे वाटतेय की ते करत नाहीत, असे या फॅनने म्हटले होते.
यावर फराहने रोखठोक उत्तर दिले आहे. मी नमाज पठन करत नाही. परंतू मी रोजा पाळते. याशिवाय मी माझ्या कमाईचा काही भाग दानही करते, ज्याला जकात म्हणतात. याचबरोबर मी लोकांसोबत चांगले वागते. इमानदारीने आणि खूप मेहनत करते. मला वाटते दिवसातून पाचवेळा नमाज पठन करण्यापेक्षा हे करणे जास्त चांगले आहे, असे उत्तर फराह खानने दिले आहे.
इतर सेलिब्रिटींबाबत बोलायचे झाले तर, शाहरुख मनाने एक चांगला व्यक्ती आहे. तो खूप देणगी देतो आणि लोकांना मदत करतो. तब्बू माझी खूप जवळची मैत्रीण आहे. ती दररोज नमाज अदा करते. तिने ते केले नाही तरी ती चांगली आहे. मला सलमान खानबद्दल माहिती नाही. पण तो लोकांना खूप मदत करतो, मला वाटतं की ही जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, धर्म नाही, असे उत्तर फराहने दिले आहे.