Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 20:39 IST

कोहलीनं सोशल मीडियावरील पोस्टसह व्यक्त केलं दु:ख

Cricketers Emotional Post On Actor Dharmendra Death : हिंदी सिनेसृष्टीत आपली अनोखी छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक पोस्ट करत देओल कुटुंबियांसोबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोहलीनं सोशल मीडियावरील पोस्टसह व्यक्त केलं दु:ख

विराट कोहलीनं अधिकृत एक्स अकाउंटवरुन पोस्ट शेअर करताना लिहिलंय की,आज आपण भारतीय सिने सृष्टीतील एका महान कलावंताला गमावलं आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनय कौशल्याने त्यांनी असंख्य मनं जिंकली. चाहत्यांसाठी ते  एक प्रेरणास्थान होते. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियां मनःपूर्वक संवेदना. अशा आशयाच्या शब्दांत विराट कोहलीनं धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

सचिन तेंडुलकरनं जुन्या आठवणींना दिला उजाळा,  "ते मला नेहमी म्हणायचे की,...

सचिन तेंडुलकर याने धरमपाजींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना लिहिलंय की,

इतरांप्रमाणे, माझ्या मनात देखील धर्मेंद्रजींबद्दल क्षणात आपुलकीची भावना निर्माण झाली. त्यांच्या बहुमुखी अभिनयाने त्यांनी आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं. प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्यासोबतच नातं अधिक घट्ट झालं. त्यांच्यात कमालीची ऊर्जा होती. ते मला नेहमी म्हणायचे, "तुम्हें देखकर एक किलो खून बढ़ जाता है मेरा." आता त्यांच्या जाण्याने "मेरा दस किलो खून कम हो गया हैं" अशी भावना मनात दाटून आली आहे.

  अशा शब्दांत भावूक पोस्ट शेअर केली आहे. धर्मेंद्रजी तुम्ही आठवण येईल, असा उल्लेखही त्याने या पोस्टमध्ये केल्याचे दिसते.  

युवी-भज्जीसह धवननेही शेअर केली खास पोस्ट 

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरशिवाय शिखर धवन, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनीही सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या मनातील भावना बोलून दाखवत दु:ख व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharmendra's Demise: Sachin, Virat Express Grief; 'He Always Said...'

Web Summary : Veteran actor Dharmendra passed away at 89. Cricketers like Sachin and Virat expressed condolences. Sachin reminisced about Dharmendra's warmth, recalling his affectionate words.
टॅग्स :धमेंद्रऑफ द फिल्डसचिन तेंडुलकरविराट कोहलीयुवराज सिंगहरभजन सिंगशिखर धवन