Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बजेटपूर्वी सोने-चांदी धडाम! चांदी ९% तर सोने ६% कोसळले, खरेदीची संधी की अजून घसरण?

बजेटपूर्वी सोने-चांदी धडाम! चांदी ९% तर सोने ६% कोसळले, खरेदीची संधी की अजून घसरण?

Gold and Silver Prices : सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत आणि विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गेल्या दोन ते तीन सत्रांपासून ते घसरत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:03 IST2026-02-01T11:02:45+5:302026-02-01T11:03:25+5:30

Gold and Silver Prices : सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत आणि विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गेल्या दोन ते तीन सत्रांपासून ते घसरत आहेत.

Gold and Silver Prices Plunge Ahead of Budget 2026: Silver Down by 9% on MCX | बजेटपूर्वी सोने-चांदी धडाम! चांदी ९% तर सोने ६% कोसळले, खरेदीची संधी की अजून घसरण?

बजेटपूर्वी सोने-चांदी धडाम! चांदी ९% तर सोने ६% कोसळले, खरेदीची संधी की अजून घसरण?

Gold and Silver Prices : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच कमोडिटी बाजारात मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही काळापासून उच्चांकी स्तरावर असलेल्या सोने आणि चांदीच्या किमती आज, १ फेब्रुवारी रोजी सकाळी जोरात आपटल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात तब्बल ९ टक्क्यांची, तर सोन्याच्या दरात सुमारे ६ टक्क्यांची जबरदस्त घसरण नोंदवण्यात आली. जागतिक स्तरावर डॉलरचा वाढता प्रभाव आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली ही या पडझडीची मुख्य कारणे मानली जात आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ लाईव्ह अपडेट्स इथे पहा.

वायदा बाजारातील आजची स्थिती
सकाळी ९:५२ वाजेपर्यंत वायदा बाजारात दोन्ही धातूंनी आपली चमक गमावली होती.
सोने (एप्रिल डिलिव्हरी): ५.९४% घसरून १,४३,३०० रुपये प्रति १० ग्रॅम वर आले.
चांदी (मार्च डिलिव्हरी): ९% घसरून २,६५,६५२ रुपये प्रति किलो वर घसरली.

तुमच्या शहरातील आजचे 'हाजिर' भाव (प्रति ग्रॅम)

शहर २४ कॅरेट (शुद्ध सोने) २२ कॅरेट (दागिने सोने) १८ कॅरेट 
मुंबई १६,०५८ १४,७२० १२,०४४ 
दिल्ली १६,०७३ १४,७३५ १२,०५९ 
पुणे/बेंगळुरू १६,०५८ १४,७२० १२,०४४ 
चेन्नई १६,२५५ १४,९०० १२,८०० 

का कोसळले सोने-चांदी?

  1. केविन वॉर्श यांची निवड : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी केविन वॉर्श यांची निवड केली आहे. वॉर्श हे व्याजदर कपातीबाबत कडक धोरण ठेवण्यासाठी ओळखले जातात. यामुळे डॉलर अधिक मजबूत झाला असून सोन्यावर दबाव वाढला आहे.
  2. नफावसुली : सोने-चांदीने नुकतेच विक्रमी स्तर गाठले होते. बजेटपूर्वी सुरक्षितता म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला नफा काढून घेण्यावर भर दिला आहे.
  3. डॉलरचा प्रभाव : जागतिक बाजारात डॉलर इंडेक्स वधारल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्या आहेत.

वाचा - बाजाराची सपाट सुरुवात! अर्थमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सेन्सेक्स-निफ्टी अस्थिर; गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

घसरण कायम राहणार?
तज्ज्ञांच्या मते, अल्पकाळासाठी ही घसरण अशीच सुरू राहू शकते. मात्र, जागतिक भू-राजकीय स्थिती पाहता दीर्घकाळासाठी सोन्याची स्थिती पुन्हा मजबूत होऊ शकते.

Web Title : बजट से पहले सोना-चांदी धड़ाम: खरीदें या इंतजार करें?

Web Summary : बजट से पहले, कमोडिटी बाजार में सोना और चांदी के दामों में भारी गिरावट आई। एमसीएक्स पर चांदी 9% और सोना 6% तक गिरा। डॉलर की मजबूती और मुनाफावसूली के कारण गिरावट आई। विशेषज्ञों के अनुसार, अल्पकालिक अस्थिरता, लेकिन वैश्विक कारकों से दीर्घकालिक लाभ की संभावना है।

Web Title : Gold and Silver Prices Crash Before Budget: Buy or Wait?

Web Summary : Ahead of the budget, gold and silver prices plummeted, with silver dropping 9% and gold 6% on MCX. A stronger dollar and profit-taking drove the decline. Experts suggest short-term volatility but potential long-term gains due to global factors.