The stock market surged for the first time, surpassing the Sensex 42000, and also the Nifty | Share Market Updates : शेअर बाजारात उसळी, पहिल्यांदाच सेन्सेक्स 42000च्या पार, निफ्टीतही उत्साह
Share Market Updates : शेअर बाजारात उसळी, पहिल्यांदाच सेन्सेक्स 42000च्या पार, निफ्टीतही उत्साह

नवी दिल्लीः शेअर बाजारात आज कमालीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारावर पहिल्या टप्प्यात हस्ताक्षर झाल्यानंतर बाजारात तेजी आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 187 अंकांच्या वाढीसह 42059.45 स्तरावर पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 9.70 अंक म्हणजे 0.08 टक्क्यांनी वाढून 12,353च्या स्तरावर खुलला.  

दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील चर्चासुद्धा सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर टॅरिफ हटवण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये IPR प्रकरणातही सहमती झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील करारानंतर चीनकडून टॅरिफ हटवलं जाणार आहे. चीनवर यापुढे दबाव राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी टॅरिफ हटवण्याचा कोणताही उद्देश नाही. दुसऱ्या टप्प्यातील करारानंतर हे टॅरिफ हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. येस बँक, गेल, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, जी लिमिटेड, भारती एअरटेल, पावर ग्रिड आणि एसबीआयचे समभाग हे हिरव्या चिन्हावर उघडले. तर वेदांता लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एनटीपीसी, हीरो मोटोकॉर्प, टायटन, टाटा मोटर्स, एम अँड एम आणि कोल इंडियाचे समभाग लाल निशाण्यावर उघडले आहेत.

निफ्टीतही आयटी आणि मेटल सोडल्यास सर्वच क्षेत्रातील इंडेक्स हिरव्या निशाण्यावर आहेत. निफ्टीतही ऑटो इंडेक्स 0.03 टक्के, पीएसयू बँक इंडेक्स जवळपास 0.32 टक्के, खासगी बँक इंडेक्स 0.18 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. आयटी इंडेक्स 0.03 टक्के आणि मेटल इंडेक्स 0.80 टक्क्यांची घसरण झाली. बँकेचा निफ्टी 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 31,904च्या जवळपास राहिला आहे. 

English summary :
Share Market Updates : The index for the Bombay Stock Exchange increased with 187 points and crossed 42000. The Nifty of the National Stock Exchange also gained 9.70 points, (or 0.08 per cent). For more news in Marathi visit Lokmat.com.


Web Title: The stock market surged for the first time, surpassing the Sensex 42000, and also the Nifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.