Join us

सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:03 IST

How To Become Billionaire : अनुपम मित्तल म्हणतात की जेव्हा एखाद्याकडे पुरेसे पैसे असतात तेव्हा त्यांनी सर्वात आधी घर खरेदी करावे. डोक्यावर छप्पर असल्यास ते मोठे धोके पत्करू शकतात.

How To Become Billionaire : सध्या प्रत्येकाला श्रीमंत होण्याची घाई झाली आहे. यासाठी काही जण कठोर परिश्रमाला गुरुकिल्ली मानतात, तर काही जण 'स्मार्ट इन्व्हेस्टिंग'ला सर्वोत्तम पर्याय मानतात. तर काही असेही आहेत, ज्यांना वाटतं आपल्याला यशाचा शॉर्टकट सापडेल. लोकप्रिय उद्योजक आणि शादी डॉट कॉमचे संस्थापक यांचं मत जरा वेगळं आहे. त्याचं म्हणणं आहे की या जगात प्रत्येक माणूस कोट्यधीश सोडा अब्जाधीश होऊ शकतो.

युवा पिढीला यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांनी आजच्या काळातही आपल्या वाडवडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण त्यात खूप खोल आर्थिक बुद्धिमत्ता दडलेली आहे, असे मित्तल यांचे मत आहे. त्यांनी विशेषतः तरुणांना चक्रवाढ या संकल्पनेची शक्ती ओळखण्याचे आवाहन केले आहे.

श्रीमंतीची गुरूकिल्ली

  • एका मुलाखतीत अनुपम मित्तल यांनी नवीन गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याचा नेमका मार्ग सांगितला केला.
  • मित्तल यांच्या मते, जर तुम्ही २० व्या किंवा ३० व्या वर्षाच्या सुरुवातीला असाल, तर खरी संपत्ती बनवण्याचे रहस्य 'कंपाउंडिंग'मध्ये दडलेले आहे, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मानवी मेंदू कंपाउंडिंगची ताकद योग्यरित्या समजू शकत नाही, म्हणूनच लोक लवकर श्रीमंत होण्याच्या नादात चुकीचे मार्ग निवडतात.
  • २० वर्षांची एसआयपी : कोणताही धोका पत्करल्याशिवाय किंवा कोणताही एक विशिष्ट स्टॉक निवडल्याशिवाय, जर तुम्ही २० वर्षे सातत्याने शेअर बाजारात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीद्वारे गुंतवणूक करत राहिलात, तर तुम्ही १०० कोटी रुपये कमवू शकता आणि अब्जाधीश होऊ शकता.

सोने खरेदी करा!सोनं आणि चांदीत गुंतवणूक करणे योग्य आहे का, या प्रश्नावर मित्तल यांनी आपल्या सासऱ्याचा एक किस्सा सांगितला.मित्तल म्हणाले, "जेव्हा माझ्या सासऱ्यांनी माझ्या पत्नीला सोने खरेदी करण्यास सांगितले, तेव्हा मी म्हणालो होतो की 'सोन्यात कोणताही चांगला परतावा मिळणार नाही, कारण यात कंपाउंडिंग होत नाही'. पण, ते सोने आज ३ ते ४ पटीने वाढले आहे." ते पुढे म्हणाले की, आपले पूर्वज जे म्हणायचे, 'सोनं खरेदी करा, घर खरेदी करा', त्यात खरी हुशारी होती.

वाचा - कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल

आधी घर खरेदी कराअनुपम मित्तल यांनी तरुणांना सल्ला दिला की, जेव्हा तुमच्याकडे पुरेशी रक्कम जमा होईल, तेव्हा सर्वात आधी स्वतःचे घर खरेदी करा. "जेव्हा डोक्यावर स्वतःचे छत असते, तेव्हा माणूस अधिक मोठे आर्थिक आणि व्यावसायिक धोका पत्करू शकतो," असे त्यांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anupam Mittal's wealth mantra: Gold, home, and billionaire secrets.

Web Summary : Anupam Mittal advises youngsters to embrace compounding, invest in gold, and prioritize homeownership. He emphasizes that anyone can become a billionaire by following traditional financial wisdom and long-term investment strategies, like SIP.
टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारसोनंसुंदर गृहनियोजनबांधकाम उद्योग