Join us
Daily Top 2Weekly Top 5

आखातात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे ३७ लाख कोटींचे नुकसान; चांदी १७८००ने कोसळली, सोने ७००० रुपये स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 06:51 IST

जून २०२४ नंतरची ही सर्वात मोठी एकदिवसीय घसरण ठरली. निफ्टीही ७७५.६५ अंकांनी (३.२६%) घसरून २३,००२.१५ वर बंद झाला. 

फेब्रुवारी २८ पासून सुरू झालेल्या पश्चिम आशिया संकटानंतर आतापर्यंत गुंतवणूकदारांचे एकूण ₹३७ लाख कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. गुरुवारीही तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागत, ३० शेअर्सचा सेन्सेक्स तब्बल २,४९६.८९ अंकांनी म्हणजेच ३.२६% नी घसरून ७४,२०७.२४ वर बंद झाला. जून २०२४ नंतरची ही सर्वात मोठी एकदिवसीय घसरण ठरली. निफ्टीही ७७५.६५ अंकांनी (३.२६%) घसरून २३,००२.१५ वर बंद झाला. 

जागतिक बाजारही क्रॅश  -आशियातील कोस्पी, निक्केई, शांघाय आणि हँगसेंग निर्देशांक घसरले. युरोपियन बाजारातही मोठी घसरण दिसून आली, तर अमेरिकन बाजार बुधवारीच कोसळले होते.

घसरणीमागील कारणे -- जागतिक पातळीवर वाढती महागाईची चिंता- अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि जपानच्या मध्यवर्ती बँकेची कडक भूमिका - कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती- अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता

चांदी १७,८००ने कोसळली, सोने ७,००० रुपये स्वस्तजागतिक कमॉडिटी बाजारातील मोठ्या विक्रीमुळे गुरुवारी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत तीव्र घसरण नोंदवली गेली. चांदीच्या दरात तब्बल १७,८०० रुपये (७%) प्रति किलोची घसरण झाली, सोने ७,००० रुपयांनी स्वस्त झाले. विशेष म्हणजे, २९ जानेवारी रोजीच्या ४,०४,५०० रुपये प्रति किलो या उच्चांकापासून चांदी तब्बल १,६५,८०० रुपये म्हणजेच ४१% नी खाली आली आहे. सोन्यानेही २९ जानेवारीच्या १,८३,००० रुपये प्रति १० ग्रॅम या उच्चांकापासून २९,७०० रुपये म्हणजेच १६.२३% घसरण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War fears trigger ₹37 lakh crore investor loss; gold, silver crash.

Web Summary : Geopolitical tensions caused massive investor losses, exceeding ₹37 lakh crore. Sensex plunged, marking the biggest drop since June 2024. Gold and silver prices crashed, with silver plummeting by ₹17,800 per kg.
टॅग्स :इराणयुद्धअमेरिकाशेअर बाजारसोनंचांदी