Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2023-24 Live Updates: अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून आज कोणत्या नव्या घोषणा? सर्वसामान्यांचं बजेटकडे लक्ष

Union Budget 2023-24 Live Updates: अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून आज कोणत्या नव्या घोषणा? सर्वसामान्यांचं बजेटकडे लक्ष

Indian Union Budget 2023-24 Live News Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा ...

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 07:55 AM2023-02-01T07:55:55+5:302023-02-01T08:08:23+5:30

Indian Union Budget 2023-24 Live News Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा ...

india union budget 2023 24 live updates news nirmala sitharaman income tax slab salaried taxpayer cheaper costlier and new schemes | Union Budget 2023-24 Live Updates: अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून आज कोणत्या नव्या घोषणा? सर्वसामान्यांचं बजेटकडे लक्ष

Union Budget 2023-24 Live Updates: अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून आज कोणत्या नव्या घोषणा? सर्वसामान्यांचं बजेटकडे लक्ष

Indian Union Budget 2023-24 Live News Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करतील. जगभरात मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोकरकपातीचा धडाका लावला आहे. भारताच्या उंबरठ्यावर मंदीचे ढग जमू शकतात, असा कयास बांधला जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूने कौल देत दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

LIVE

Get Latest Updates

08:11 AM

अर्थसंकल्पात रेल्वेलाही मोठ्या आशा

वंदे भारत २.०, ३५ हायड्रोजन ट्रेनची भेट मिळू शकते. या अर्थसंकल्पात ४०० ते ५०० वंदे भारत गाड्या, ४००० नवीन ऑटो मोबाईल वाहक डबे, ५८००० वॅगन गाड्यांची भेट मिळू शकते.

08:06 AM

निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प

सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवतील.