Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या रविवार, १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन रविवारी बजेट सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, रविवार असूनही उद्या शेअर बाजार व्यवहारांसाठी सुरू राहणार आहे. यामुळे बजेटमधील घोषणांचा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम होईल. अर्थसंकल्पाच्या दिवशी कोणत्या क्षेत्रातील शेअर्स केंद्रस्थानी असतील, त्याचा हा आढावा:
कॅपिटल गेन टॅक्स आणि ब्रोकिंग शेअर्स
जर अर्थमंत्र्यांनी कॅपिटल गेन टॅक्सबाबत मोठी घोषणा केली, तर त्याचा परिणाम ब्रोकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांवर होईल. यामध्ये मोतीलाल ओसवाल, एंजल वन, आनंद राठी, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, ३६० ONE WAM आणि ग्रो यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये राहतील.
या बँकेचा ६० टक्के हिस्सा सरकार विकणार; निश्चित झाली डेडलाईन, जाणून घ्या
टेक्स्टाईल (कापड उद्योग) क्षेत्र
अमेरिकन टॅरिफमुळे सध्या भारतीय टेक्स्टाईल उद्योग दबावाखाली आहे. अर्थसंकल्पात या क्षेत्राला दिलासा मिळाल्यास गोकलदास एक्सपोर्ट्स, वेलस्पन लिविंग, अरविंद, इंडो काउंट इंडस्ट्रीज आणि केपीआर या शेअर्समध्ये हालचाल पाहायला मिळू शकते.
पॉवर आणि रिन्यूएबल एनर्जी
सौर आणि पवन ऊर्जेवर भर दिल्यास टाटा पॉवर, अदानी पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, सुझलॉन एनर्जी आणि टॉरंट पॉवर या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. तसेच REC, PFC आणि IREDA या पॉवर फायनान्स कंपन्यांच्या शेअर्सवरही गुंतवणूकदारांचं लक्ष असेल.
बँकिंग, NBFC आणि विमा क्षेत्र
एमएसएमई क्रेडिट गॅरंटी योजनेचा विस्तार किंवा बँकिंगचे नवे नियम लागू झाल्यास SBI, PNB, HDFC बँक, ICICI बँक, बजाज फायनान्स आणि L&T फायनान्स यांना लाभ होऊ शकतो. विमा क्षेत्रात HDFC लाइफ, SBI लाइफ, ICICI प्रूडेंशियल, मॅक्स फायनान्शिअल आणि LIC या कंपन्यांचे शेअर्स केंद्रस्थानी राहतील.
रेल्वे आणि ऑटो सेक्टर
रेल्वे क्षेत्रासाठीच्या घोषणांमुळे टिटागड रेल, टेक्समॅको रेल, BEML, RVNL, इरकॉन आणि राईट्सच्या शेअर्समध्ये चढ उतार दिसण्याची शक्यता आहे. ऑटो सेक्टरमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर्स, ओला इलेक्ट्रिक आणि JBM ऑटो या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर असेल.
इतर महत्त्वाचे शेअर्स
डेटा सेंटरच्या विकासासाठी धोरणं जाहीर झाल्यास हिताची एनर्जी, सीमेन्स, थर्मॅक्स, ABB इंडिया आणि GE वर्नोवा या कंपन्यांसाठी ती सकारात्मक असतील. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, L&T, TCS, नेटवेब टेक्नॉलॉजीज, DLF, गोदरेज प्रॉपर्टीज आणि औषध क्षेत्रातील डॉ. रेड्डीज, सन फार्मा, ल्युपिन व सिप्ला या कंपन्यांच्या शेअर्समध्येही हालचाल दिसून येईल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

