Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप...

Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप...

Budget 2024: नवीन सरकार स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष बजेट सादर केले जाणार असले तरीही त्याचे काही सूतोवाच या बजेटमध्ये दिले आहेत. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी खालील सेक्टरमधील शेअर्सवर नजर ठेवावी.

By पुष्कर कुलकर्णी | Published: February 2, 2024 11:58 AM2024-02-02T11:58:56+5:302024-02-02T12:01:04+5:30

Budget 2024: नवीन सरकार स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष बजेट सादर केले जाणार असले तरीही त्याचे काही सूतोवाच या बजेटमध्ये दिले आहेत. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी खालील सेक्टरमधील शेअर्सवर नजर ठेवावी.

Budget 2024: Create a roadmap for your wealth now... | Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप...

Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप...

- डाॅ. पुष्कर कुलकर्णी 
(गुंतवणूक विश्लेषक)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अंतरिम बजेट सादर केले. कॅपेक्समधील वाढ, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स जैसे थे, इन्फ्रासाठी तरतूद, वित्तीय घट कमी करण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न या बाबी शेअर बाजारासाठी सकारात्मक ठरू शकतात. नवीन सरकार स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष बजेट सादर केले जाणार असले तरीही त्याचे काही सूतोवाच या बजेटमध्ये दिले आहेत. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी खालील सेक्टरमधील शेअर्सवर नजर ठेवावी.

गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सादर होणाऱ्या बजेटवर नजर ठेवावी. अर्थमंत्री यात विकसित भारताचा रोड मॅप सादर करणार आहेत. महत्त्वाच्या क्षेत्रात तसेच भारतीयांचा स्तर उंचविण्यावर भर राहून नेमका विकास कसा असेल यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न राहील. उत्तम कंपन्या हेरून दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. विकसित भारताबरोबरच श्रीमंतीचा रोडमॅप तयार करा.

कायम चार्ज राहणारे ऊर्जा क्षेत्र 
रिन्यूएबल एनर्जी क्षेत्र वाढत आहे. सोलार, विंड न्यूक्लीअर एनर्जी स्रोत वाढविण्यावर भविष्यकाळात भर राहणार आहे. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना चांगला वाव राहील.

इ-वाहनातून मस्त प्रवास  
सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढविण्यात येणार आहे. यामुळे अशा बसेस बनविणाऱ्या कंपन्यांना ऑर्डर्स मिळू शकतात. 
इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी जे जे सुटे भाग लागतात आणि त्या बनविणाऱ्या ऑटो अँसिअलिरी कंपन्या यांचा व्यवसाय वाढू शकेल. 
वाहनांसाठी इलेक्ट्रिक वायर तसेच टेक्नॉलॉजी यातील कंपन्यांचा व्यवसाय वाढू शकतो.

तुला जोडीनं भारतात फिरवीन
पर्यटन विकास भारतात पर्यटन वाढत आहे. येणाऱ्या काळात अधिकाधिक पर्यटन ठिकाणे विकसित केली जाणार आहेत. यामुळे हॉटेल्स, थेट आणि ऑनलाइन सेवा प्रदान करणाऱ्या  ट्युरीझम कंपन्या यांच्या व्यवसायात तेजी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

इन्फ्रा विकास 
रेल्वे, रस्ते आणि जल वाहतूक विकास भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. विकसित भारत घडविण्याच्या उद्देशाने येणाऱ्या काळात यावर अधिक भर राहील. केंद्र सरकार अधिक पैसे यासाठी खर्च करेल. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना अधिक व्यवसाय मिळेल. 
 

Web Title: Budget 2024: Create a roadmap for your wealth now...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.