Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2024 : १ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Budget 2024 : १ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:19 PM2024-02-01T12:19:12+5:302024-02-01T12:20:24+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही.

1 lakh crore corpus will be created interest free loans will be given up to 50 years See what the finance minister said | Budget 2024 : १ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Budget 2024 : १ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Nirmala Sitharaman Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. तसंच विकसित भारताचा रोडमॅप जुलैमध्ये तयार केला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. 
 

तंत्रज्ञान जाणणाऱ्या तरुणांसाठी हा सुवर्णकाळ आहे. ज्या तरुणांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एक पाऊल पुढे टाकायचं आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. त्यांनी १ लाख कोटी रुपयांचा असा कॉर्पस तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिलं जाईल. ही कर्जे दीर्घकालीन वित्तपुरवठा आणि पुनर्वित्तपुरवठा यासाठी अत्यंत कमी किंवा शून्य व्याजदराने दिली जातील.


३०० युनिट मोफत वीज


अंतरिम बजेट सादर करत असून या बजेटदरम्यान अर्थमंत्र्यांनी मोफत वीज देण्याबाबत मोठी घोषणा केली. रूफटॉप सोलर पॅनलच्या माध्यमातून सरकारकडून १ कोटी घरांना दरमहिन्याला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी केली आहे. 
 

उडान योजनेंतर्गत काम
 

"सरकारकडून मत्स योजनेसह मोहरी आणि भुईमुगाच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. तसंच कृषी क्षेत्रासाठी मॉडर्न स्टोरेज आणि सप्लाई चेनवर सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे. छोट्या शहरांना जोडण्यासाठी ५१७ नव्या मार्गांवर UDAN योजनेच्या अंतर्गत काम होणार आहे. सर्वांसाठी घर, पाणी आणि वीज यावर आमचा भर आहे," असा दावाही निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर करताना केला आहे.

Web Title: 1 lakh crore corpus will be created interest free loans will be given up to 50 years See what the finance minister said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.