फिस्क्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय आहे. सेव्हिंग अकाऊंटच्या तुलनेत यामध्ये व्याज अधिक मिळतं. एफडीद्वारे, एक निश्चित रक्कम निश्चित कालावधीसाठी पूर्वनिर्धारित व्याज दरानं गुंतविली जाते. जर गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला जास्त व्याजदर दिला जातो.
यामध्ये ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागते. विहित व्याजदरानुसार व्याज दिले जातं. परंतु सरकारी, गैर-सरकारी बँका, पोस्ट ऑफिस अशा विविध वित्तीय संस्थांमध्ये व्याजदर वेगवेगळे असतात. फिक्स्ड डिपॉझिट अंतर्गत, जास्तीत जास्त १० वर्षांसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते.
मुदत ठेवींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याजदर. गुंतवलेल्या रकमेवर कमावलेला हा नफा आहे. भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करते. त्यानुसार, वित्तीय संस्था व्याजदर देतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे व्याज दर देतात, ज्याचा थेट परिणाम ठेवींवरील प्राप्त रकमेवर होतो. सध्या यावर ७ ते ९ टक्के दराने व्याज दिले जात आहे.