ठळक मुद्देडिसेंबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची सुरुवात 3 तारखेपासून होईल. 3 डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील.
नवी दिल्ली : वर्षातील शेवटचा महिना डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर डिसेंबर महिन्यात बँका 14 दिवस बंद (Bank Holidays December 2020) राहतील.
जर डिसेंबर महिन्यात आपल्याला बँकेशी संबंधित काही काम असल्यास सुट्ट्या पाहून नियोजन करा. सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकांना सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्या संबंधित राज्यांनुसार वेगवेगळ्या असतात. तर तुम्ही बँकेत जाण्यापूर्वी लिस्ट पाहून जाऊ शकता.
3 डिसेंबरला बँक बंद राहील
डिसेंबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची सुरुवात 3 तारखेपासून होईल. 3 डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील. यानंतर 6 तारखेला रविवारी असल्याने बँकांना देशभरात साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 तारखेला डिसेंबर महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर, रविवारी 13 तारखेला साप्ताहिक सुट्टी असेल.
या दिवसही सुट्टी असेल
गोव्यामध्ये 17 डिसेंबरला लॉसोन्ग पर्व, 18 डिसेंबरलाडेथ अॅनिव्हर्सरी यू सो थम आणि 19 डिसेंबरला गोवा मुक्ति दिनची सुट्टी असेल. यानंतर, 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
ख्रिसमसची सुट्टी दोन दिवस असेल
डिसेंबरमध्ये ख्रिसमसलाही दोन दिवस सुट्टी असेल. 24 आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असेल. तसेच 26 डिसेंबरला महिन्याचा चौथा शनिवारी असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी असेल आणि 27 डिसेंबर रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल. याचबरोबर, 30 डिसेंबरला यू कीअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: bank holidays in december 14 days bank will close in december 2020 check full list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.