परभणी जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील पारा ७.८ अंशांवर होता.
मात्र, रविवारी त्यात आणखी घसरण होऊन पारा ४.६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने परभणीकर गारठल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
यावर्षीच्या सर्वांत कमी तापमानाची नोंद असल्याचे दिसून येते. वनामकृविच्या हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार रविवारी किमान तापमान ४.६, तर आयएमडीच्या नोंदीनुसार हे तापमान ८.६ एवढे नोंदविले गेले.
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात धुक्याची चादर सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. दोन दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. शनिवारी जिल्ह्यातील पारा ७.८ अंशांवर होता.
मात्र, रविवारी त्यात जवळपास ३ अंशांनी घसरून ४.६ अंशांवर पोहोचला. त्यामुळे परभणीकरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव आला. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे.
आठवडाभरात १० अंशांची झाली घट
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली होती. सोमवारी जिल्ह्यातील पारा १४ अंशांवर होते. रविवारी पारा १० अंशांनी घसरून ४.६ अंशांवर पोहोचला आहे.
थंडीची लाट राहणार
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ४८ तासांत किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
Cotton Market Update : यंदा भाववाढीची अपेक्षा ठरतेय फोल; साठवलेल्या कापसाची शेतकऱ्यांकडून विक्री