Join us

नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:44 AM

पाणीटंचाईचा प्रश्न पेटण्याची चिन्हे...

यंदा पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे मराठवाड्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, आता विजयादशमीनंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, सध्या नाशिक जिल्ह्यातच जेमतेम धरणात साठा असून, त्यामुळे आता मराठवाड्यासाठी पाणी कसे सोडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यास विरोध केले आहेच, शिवाय मेंढी गरी समितीच्या शिफारसींचा आता फेर आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. नाशिकमधून पूर्वी नाशिक, नगर असा पाण्याचा वाद होता. आता मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रचंड मोठ्या जायकवाडी जिल्ह्यातील धरणात धरणातून नाशिक पाणी सोडण्यासाठी दबाव आणला जातो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातच समाधानकारक स्थिती नसेल तर वाद पेटतो. 

काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी सर्व पक्षीय नेते गंगापूर धरणावर गेले होते. दरम्यान, यंदा राज्यात सर्वच ठिकाणी कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट आहे तर जायकवाडी धरणात ४७ टक्के पाणी देण्यास विरोध नाही; पण मुबलक साठा हवा साठा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा समूहातून पाणी सोडण्याची साठा सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक मंगळवारी (दि. १७) छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यात नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून सुमारे १३ टीएमसी पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली असून, दसऱ्यानंतर यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये अस्वस्थता आहे.

  1. दुष्काळ काळात मराठवाडा नव्हे तर अन्य कोणत्याही भागाला पाणी देण्यास विरोध नाही. मात्र, नाशिकमध्ये मुबलक साठा असला पाहिजे, अशी येथील राजकीय नेत्यांची भूमिका आहे. यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमध्ये दुष्काळी स्थिती आहे, जेमतेम पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. मात्र, केवळ मराठवाड्याला पाणी लागते म्हणून नाशिकला पाणी सोडणे योग्य ठरणार नाही. 
  2. मुळात आगामी काळात मराठवाड्याला पाणी कशासाठी हवे, याचे नियोजन स्पष्ट करायला हवे, कारण मुबलक पाण्यावर घेतले जाणारे उसाचे पीक घेतल्याने त्याचा वापर वाढतो, त्यातच कारखाने देखील मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरवर चालतात. त्यामुळे सर्व नियोजन स्पष्ट केले पाहिजे, तोपर्यंत पाणी देऊ नये, असे मत आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले. 

क्षमता ७२०० दशलक्ष

गंगापूर धरणाची क्षमता ७२०० दशलक्ष घनफूट असताना मेंडीगिरी समितीने समन्यायी पाणी वाटप म्हटले होते. मात्र, आता धरणात ५६०० दशलक्ष घनफूट इतकीच क्षमता आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे अशा स्थितीत मराठवाड्याला पाणी कसे देणार, असा प्रश्न आमदार फरांदे यांनी केला आहे.

तूटीचे खोरे

  1. मुळात गोदावरी हे तुटीचे खोरे आहे. त्यामुळे नाशिकहून पाणी घेण्याऐवजी या संपूर्ण खोयात पाणी वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मेंढीगिरी समितीच्या अहवालाचा फेरआढावा घेतला पाहिजे, हे न्यायालयानेदेखील सूचित केले आहे. मेंढीगिरी समितीने पंधरा ते वीस वर्षांपूर्वी अहवाल देतानाच ते स्पष्ट केले आहे. 
  2.  जेव्हा ही समिती गठीत झाली त्यावेळी नाशिकची स्थिती वेगळी होती आणि आता प्रचंड लोकसंख्या वाढली असल्याने नाशिकलाच पाणी कमी पडू लागले आहे, असे मत जलचिंतन संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. 
  3. मराठवाड्याच्या पाण्याबाबत मी स्वत:च उच्च न्यायालयात याचिका दाखल केले होती, त्याचा २०१७ मध्येच निकाल लागला आहे, त्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. शिवाय मेंढीगिरी शिफारसीच्या कोष्टकात सुधारणा करण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्याशिवाय पाणी सोडू नये, असेही जाधव म्हणाले.
टॅग्स :धरणपाणीकपातपाणीनाशिकमराठवाडामराठवाडा वॉटर ग्रीड