Join us
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांचा पाणीसाठा घटला; उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:01 IST

सध्या दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा वाढू लागला आहे आणि त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी तलावात मृत संचयी पाणीसाठा असून, उर्वरित तलावांमध्ये मध्यम आणि अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे.

सध्या दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा वाढू लागला आहे आणि त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी तलावात मृत संचयी पाणीसाठा असून, उर्वरित तलावांमध्ये मध्यम आणि अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे.

तीन महिन्यांत या पाणीसाठ्यात घट होण्याची शक्यता असून भविष्यात पाणीटंचाईची चिन्हे आहेत. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील तलाव, नद्या, ओढे, नाले, विहिरी यामध्ये भरपूर पाणीसाठा झाला होता. पीक हंगाम आणि द्राक्ष बागा बऱ्याच प्रमाणात पार पडल्या आहेत. पण सध्या तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

अवघ्या महिन्या दीड महिन्यातच पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर हे तलाव टेंभू किंवा म्हैसाळ योजनेतून भरून घेणे आवश्यक आहे, तरच उन्हाळ्यात टंचाईवर मात होऊ शकते.

तलावांमधील सध्याचा पाणीसाठा (आकडे द.ल.घ.मी.)

कुची - ५२.१२रायवाडी - ५९.४९लांडगेवाडी - मृतसंचयी पाणीसाठालंगरपेठ - ४२.६३नांगोळे - १६.८४बोरगाव - १५.८४हरोली - १७.०९घोरपडी - ३०.५८बंडगरवाडी - ३२.४५दुधेभावी - १०७.३०बसाप्पावार्ड - २६६.६७

हेही वाचा : 'व्हाइट कॉलर' नोकरी सोडून उभे केले दुग्ध व्यवसायाचे साम्राज्य; जाणून घ्या काय आहे विशाल यांची यशकथा

English
हिंदी सारांश
Web Title : Water levels drop in Kavthemahankal; planning needed for summer.

Web Summary : Kavthemahankal's water reservoirs are depleting due to rising temperatures, signaling potential water scarcity. With most dams having medium to low storage, efficient water management and refilling through schemes are crucial to overcome the anticipated summer drought.
टॅग्स :सांगलीपाऊसहवामान अंदाजशेती क्षेत्रशेतकरीशेती