सांगोला : सांगोला तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी येत्या १० एप्रिलपासून टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार आहे.
यातून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार आहेत तशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात जलसंपदा विभाग अधिकारी यांच्यासमवेत पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह आमदार उपस्थित होते.
वीस गावांच्या पाणी प्रश्न सुटणारटेंभूचे पाणी माण नदीत सोडल्यानंतर बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावांसह अन्य १५ ते २० गावांचा प्रश्न सुटणार असल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
अधिक वाचा: राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पेमेंटची स्थिती; किती मिळाले तर किती अडकले?