वर्षात दोन दिवस सूर्यsun निश्चित ठिकाणी उगवतो. त्याला विषुवदिनी म्हणतात. हे दोन दिवस वगळले तर इतर वेळी सूर्याच्या उगवण्याचे स्थळ बदलत असते. काही दिवसांच्या फरकाने हा बदल लक्षात येत असतो.
उद्या (२१ डिसेंबर)ला सूर्य नेमका पृथ्वीच्या मकर वृत्तावर येईल व तेथून पुढे उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात होईल. त्यामुळे हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस ठरणार आहे. दिवस पावणेअकरा तासांचा व रात्र सव्वातेरा तासांची असणार आहे.
तेजस्वी ग्रहगोलांचे होईल दर्शन
मोठ्या रात्री आकाशात विविध तारकांसह पश्चिमेस शुक्राची तेजस्वी चांदणी, पूर्वेला गुरू ग्रह व आकाश मध्याशी वलयांकित शनी ग्रह, तर रात्री नऊनंतर पूर्वेस मंगळ व पहाटे बुध ग्रह बघता येईल. हा आनंद घेण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
२१ डिसेंबर, अयन दिन
• या दिवसापासून सूर्याच्या उत्तरायणास Uttarayan प्रारंभ होणार आहे. २१ डिसेंबर या सर्वांत लहान दिवसालाच 'अयन दिन' म्हणून ओळखतात. यावेळी सूर्य दक्षिण गोलार्धाकडे झुकलेला असल्याने त्या भागात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा हा ऋतू असतो.
• दक्षिण ध्रुवावर दीर्घ कालावधीची रात्र आणि उत्तर ध्रुवावर दीर्घ कालावधीचा दिवस सुरू असतो. या दिवसापासून सूर्याचा प्रवास मकर वृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत अर्थात उत्तरायण सुरू होऊन ते २१ जूनपर्यंत चालते.
• पृथ्वीचा अक्ष भ्रमणकक्षेशी २३.५ अंशांनी कलून फिरत असल्याने दोन्ही गोलार्धात दिनमान कमी-अधिक होते, तर २१ मार्च व २२ सप्टेंबर या वसंत व शरद संपातदिनी दिवस रात्र समान होतात.
शनिवारी (२१ डिसेंबर)ला सूर्य मकरवृत्तावर असल्याने दिवस केवळ १० तास ४८ मिनिटे व रात्र सर्वात मोठी अर्थात १३ तास १२ मिनिटांची असेल. -प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला