Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर अवकाळी पाऊस, गारपिटीचे संकट; मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 09:15 IST

Maharashtra Rain Update : राज्याला घाम फोडणाऱ्या कमाल तापमानानंतर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची चिन्हे असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

राज्याला घाम फोडणाऱ्या कमाल तापमानानंतर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची चिन्हे असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने घाट परिसर, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान राहील. मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.

कुठे किती तापमान ? (अंश सेल्सियस)

अमरावती ४४.४°परभणी ४२.२°
गडचिरोली४४°बुलढाणा४१.२°
वाशिम४४°अकोला ४१.१°
चंद्रपूर४३.६°बीड४१.१°
नागपूर४३.६°जळगाव४१.४°
वर्धा४३.५°धाराशिव४१.४°
गोंदिया४२.९°मालेगाव४०.६°
यवतमाळ४२.८°छ. संभाजीनगर४०.६°
सोलापूर४२.४°सांगली४०°

मुंबई ३४.३ अंशांवर

वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत शुक्रवारी ३३.१ अंश सेल्सियस इतके तापमात होते. शनिवारी यात एक अंशाची वाढ होऊन मुंबईत ३४.३ एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले.

कुठे कुठे पडणार पाऊस?

• १९ एप्रिल : महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खान्देश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांत दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.

• २० व २१ एप्रिल : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडेल. २२ तारखेला वादळी पावसाचे क्षेत्र आणि त्याच्या तीव्रतेत घट होईल.

उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट, मध्यम पावसाची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Faces Unseasonal Rain, Hailstorm Threat; Stormy Weather Expected

Web Summary : Maharashtra braces for unseasonal rain and hailstorms after scorching heat. Several regions, including Western Maharashtra, Khandesh, Marathwada, and parts of Vidarbha, are likely to experience thunderstorms between April 20-22. Mumbai recorded 34.3°C. Rain expected in parts of Maharashtra on April 19-21.
टॅग्स :पाऊसहवामान अंदाजशेती क्षेत्रउष्माघाततापमान