पडलेला कमी पाऊस, पिकांसाठी पाण्याचा होणारा उपसा यामुळे जिल्ह्यातील गावांमधील भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. दरम्यान, नव्या वर्षात सोलापूरकरांनापाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा मोजावा लागणार की काय, अशी शक्यता जलतज्ज्ञांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला, मात्र तोही समाधानकारक नाही. त्यातच परतीचा पाऊसही दिलासादायक झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात निर्माण होणारी परिस्थिती जानेवारी, फेब्रुवारीच्या महिन्यातच दिसून येण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाळा संपतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते. परंतु, यावर्षी कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील बहुतांश दिवस कोरडे गेले. परिणामी ऑक्टोबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक तालुक्यांमधील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली.
आराखडा तयार, सहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडेजिल्हा परिषदेने आगामी काळात होणाऱ्या टंचाईच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सहीसाठी पाठविला आहे. टंचाईच्या अनुषंगाने विहिरी अधिग्रहण करणे, जलस्त्रोत ताब्यात घेणे शिवाय टैंकर व इतर आवश्यक त्या उपाययोजना आराखड्यात करण्यात आले आहे.
मागील वर्षी उजनी धरण होते १११ टक्केयंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील शेतीसाठी उजनी धरणातीलपाणी महत्त्वाचे आहे. मात्र यंदा उजनी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी उजनी धरण याच कालावधीत १११.२८ टक्के होते, मात्र यंदा पाणीसाठ्याची टक्केवारी ३०.१६ टक्के एवढी आहे.