Join us

राज्याचे चेरापुंजी ठरलेल्या 'या' तालुक्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:23 IST

घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पात एकूण २८.६६ टीएमसी साठा जमा झाला आहे.

घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पात एकूण २८.६६ टीएमसी साठा जमा झाला आहे.

तर धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुमारे ३९ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्याचे चेरापुंजी ठरलेल्या मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात बुधवारी संपलेल्या २४ तासांत तब्बल ५७५ मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद करण्यात आली.

हा पाऊस आजवरचा सर्वाधिक पाऊस असल्याचे बोलले जात आहे. 'ताम्हिणी'त यंदाच्या मोसमात आतापर्यंत ७ हजार ४२८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

ताम्हिणी घाटात पावसाचा विक्रम◼️ गेल्या काही वर्षांपासून ताम्हिणी घाटात मोठा पाऊस पडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.◼️ गेल्या वर्षी २५ जुलै रोजी 'ताम्हिणी'त एका दिवसात ५६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती.◼️ तर २० ऑगस्ट रोजी तब्बल २५७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा आजवरचा विक्रम असण्याची शक्यता आहे.◼️ 'ताम्हिणी'त यंदाच्या मोसमात आतापर्यंत ७ हजार ४२८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हादेखील आजवरचा विक्रम आहे.

अधिक वाचा: Ranbhajya : चवीलाच नाही तर आरोग्यासाठी गुणकारी रानभाज्यांना वाढली मागणी; दरही परवडणारे

टॅग्स :पाऊसहवामान अंदाजमुळा मुठाधरणपुणे