मार्च महिन्यात आलेल्या दोन उष्णतेच्या लाटांनी आधीच हैराण केले असतानाच आता एप्रिल महिनाही प्रचंड 'ताप'दायक ठरत आहे. अकोला येथे ४४ अंश इतक्या देशातील सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी मुंबईमध्ये ३६ अंश सेल्सिअस इतका एप्रिल महिन्यातील कमाल तापमानाचा पहिला उच्चांक नोंदविण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे हे तापदायक वातावरण शुक्रवारपर्यंत राहणार आहे.
कशामुळे वाढला उकाडा?◼️ उत्तर भारतात उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.◼️ या हवामान बदलामुळे उत्तर पूर्वेकडून राज्यासह मुंबईकडे उष्ण वारे वाहत आहेत.◼️ या उष्ण वाऱ्याने राज्यभरातील बहुतांश शहरे तापली असून, कमाल तापमान ४० अंशांवर गेले आहे.◼️ विदर्भात तर कमाल तापमान ४२ अंशांवर गेले आहे.
कुठे किती कमाल तापमान?अकोला - ४४वर्धा - ४३.५सोलापूर - ४३.२यवतमाळ - ४२.६जळगाव - ४२.५नागपूर - ४२.२परभणी - ४२.१मालेगाव - ४१.६सांगली - ४१.४छ. संभाजीनगर - ४१.४धाराशिव - ४०.८बीड - ४०.९सातारा - ४०.९पुणे - ३९.९खडकवासला - ४१.६नाशिक - ३९.३कोल्हापूर - ३८.९मुंबई - ३६
जेव्हा आर्द्रता कमी नोंदविले जाते, तेव्हा तापमान वाढते. जेव्हा आर्द्रता अधिक नोंदविली जाते, तेव्हा तापमान किंचित कमी होते. - अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
अधिक वाचा: पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्डसाठी २० हजार एकरचे भूसंपादन; महामार्गात कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश?
Web Summary : Akola recorded a scorching 44°C, the highest in the country. Mumbai saw 36°C, a record for April. High pressure over North India and warm winds are blamed. Relief is not expected until Friday. Vidarbha temperatures soar above 42°C.
Web Summary : अकोला में 44 डिग्री सेल्सियस तापमान दर्ज किया गया, जो देश में सबसे अधिक है। मुंबई में अप्रैल के लिए 36 डिग्री सेल्सियस का रिकॉर्ड बना। उत्तरी भारत में उच्च दबाव और गर्म हवाओं को कारण बताया गया है। शुक्रवार तक राहत की उम्मीद नहीं है। विदर्भ में तापमान 42 डिग्री सेल्सियस से ऊपर।