Join us

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:15 IST

सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातहीपाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे.

राधानगरी धरण ६५ तर वारणा ७० टक्के भरले आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, आजरा, गगनबावडा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस आहे.

रविवारपासून वातावरणात बदल झाला असून, पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.

सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९.४ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ३०.४ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रातही सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २३४८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून ९१०९ तर दूधगंगा धरणातून ४७७५ घनफूट पाणी नदीमध्ये येत असल्याने नद्यांची पातळी दिवसभरात स्थिर राहिली आहे.

पंचगंगा नदीची पातळी २७.०८ फुटावर कायम आहे. अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. आगामी दोन दिवसांत पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

धरण भरल्याची टक्केवारीवारणा ७०%राधानगरी ६५%दूधगंगा ५०%

ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलीघटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदे.धरण - क्षमता (टीएमसी) - सद्याचा पाणीसाठाराधानगरी - ८.३४ - ५.४३तुळशी - ३.४१ - २.१७वारणा - ३४.३९ - २४.०१दूधगंगा - २५.३९ - १२.४१कासारी - २.७७ - १.७०कडवी - २.५३ - १.७४कुंभी - २.७१ - १.७३पाटगाव - ३.७१६ - २.७६कोयना - १०५.२५ - ५१.२१धोम - १३.५० - ८.०१कण्हेर - १०.१० - ६.७७उरमोडी - ९.९६ - ७.१४तारळी - ५.८५ - ३.६७बलकवडी - ४.०८ - १.१८

अधिक वाचा: छाती एवढ्या पाण्यातून कांदा आणला विक्रीला; यंदा तरी आमच्या कष्टाच सोनं होणार का?

टॅग्स :धरणपाणीपाऊसकोल्हापूरकोयना धरण