Join us

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' पाच धरणे शंभर टक्के भरली; उरलेल्या १७ धरणांत किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:52 IST

यंदा १७ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस पडत राहिला; पण अजून गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाने यंदा सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे धरणेही फुल्ल झालेली नाहीत.

कोल्हापूर : जिल्ह्यातील पाच धरणे शंभर टक्के भरली असून उर्वरित १७ धरणे अजून पूर्ण भरावयाची आहेत. ८० टक्क्यांवर पाणीपातळी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सर्व धरणे शंभर टक्के भरली होती.

मात्र, यंदा ढगाळ आणि पावसाळी वातावरण अधिक राहिले. पण, गत वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी असल्याने अजून सर्व धरणे भरलेली नाहीत, असे पाटबंधारे प्रशासनाचे म्हणणे आहे.

यंदा १७ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस पडत राहिला; पण अजून गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाने यंदा सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे धरणेही फुल्ल झालेली नाहीत.

मध्यम, लघु अशी एकूण जिल्ह्यात १७ धरणे आहेत. या धरण क्षेत्रात पाऊसही कायम आहे. मात्र, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मुसळधार पाऊस पडत नाही. यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढलेली नाही.

सध्या राधानगरी तालुक्यातील तुळशी, आजरा तालुक्यातील चिकोत्रा, आंबेओहोळ, चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणात जेवढी पाण्याची आवक आहे, तितकाच विसर्ग सुरू आहे.

कर्नाटकातील अलमट्टी फुल्लकर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या पाणीपातळी ५१९ मीटरवर आहे.धरणात १८ हजार ३०१ क्सुसेक पाण्याची आवक तर १४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.कोयना धरणात ६५८ मीटर पाणीपातळी आहे. ८४६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. २१ क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे.

धरणनिहाय पाणीसाठा (टक्केवारी)कडवी - ९९धामणी - ९९पाटगाव - ९९ चित्री - ९८वारणा - ९८कुंभी - ९८सर्फनाला - ९७राधानगरी - ९७कासारी - ९४जांबरे - ८९घटप्रभा - ८७दूधगंगा - ८४

अधिक वाचा: Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख

टॅग्स :धरणकोल्हापूरकोयना धरणपाऊसपाणी