Join us

राज्यात ह्या जिल्ह्यात तापमान पोहचले ४४ अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 10:05 AM

मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे, महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान, विभागाच्या वतीने यानिमित्ताने वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य वाढ होऊन ते आज मंगळवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान ४४ अंश झाले. मंगळवारी नोंदल्या गेलेल्या तापमानाची नोंद यंदाच्या वर्षातील उच्चांकी ठरली आहे.

मंगळवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे, महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान, विभागाच्या वतीने यानिमित्ताने वर्तविण्यात येत आहे.

शुक्रवार, दि. ५ एप्रिल रोजी या हंगामातील ४३.१ अंश इतके सर्वाधिक तापमान होते. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे.

बुधवारी, दि. २४ एप्रिल रोजी ४१.२, गुरुवारी ४१.१, शुक्रवारी ४१.२, तर शनिवारी, दि. २७ एप्रिल रोजी ४२ अंशांच्या घरात गेले होते. रविवारी शहराचे तापमान यंदाच्या ४३.७ अंश सेल्सिअस नोंदले होते.

अधिक वाचा: समुद्रावरून बाष्पयुक्त वारं येतंय आणि चढतोय पारा

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे मंगळवारी (दि. ३०) राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्याचे तापमान चांगलेच वाढू लागल्याने पुणेकर हैराण झाले आहेत, शिरूर ४३.९ आणि मगरपट्टा येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत पुण्यात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

एरवी सर्वाधिक तापमान असलेल्या विदर्भातदेखील एवढा पारा चढलेला नाही. जिल्ह्यातील २८ ऑटोमॅटिक वेदर स्टेशनपैकी ६ स्टेशनवर मंगळवारी (दि. ३०) चाळिशीच्या आत तापमान होते आणि २२ स्टेशनवर चाळिशी पार तापमान नोंदवले गेले. यावरून पुणे किती तापत आहेत, ते स्पष्ट होत आहे.

टॅग्स :तापमानहवामानसोलापूरपुणेमहाराष्ट्रविदर्भ