Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरणार; राज्यात कुठे किती तापमान?

पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरणार; राज्यात कुठे किती तापमान?

The minimum temperature will drop further in the next three days; What is the temperature in different parts of the state? | पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरणार; राज्यात कुठे किती तापमान?

पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरणार; राज्यात कुठे किती तापमान?

maharashtra weather update मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे.

maharashtra weather update मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान, मुंबईत १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, पुढील तीन दिवस राज्यभरात गारठा कायम राहील.

थंडगार वाऱ्यांमुळे हुडहुडी
हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले, उत्तर भारतातून दक्षिणेकडे गार वारे वाहत आहे. या बोचऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमान घसरले आहे. गुरुवारी किमान तापमान आणखी घसरेल.

राज्यातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
अहिल्यानगर - ७.५
छ. संभाजीनगर - १०.८
बीड - ९
डहाणू - १६.१
जळगाव - ८
कोल्हापूर - १४.६
महाबळेश्वर - ११.६
मालेगाव - ९.४
मुंबई - १६.७
नांदेड - १०.६
नंदुरबार - १२.७
नाशिक - ८.१
धाराशिव - १२.६
पालघर - १२.८
परभणी - १०.५
सांगली - १३
सातारा - ११.६
ठाणे - २१

अधिक वाचा: ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका

Web Title: The minimum temperature will drop further in the next three days; What is the temperature in different parts of the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.